New Delhi : पेट्रोल व डिझेलचे दर आजपासून वाढणार ?; पेट्रोल, डिझेलवर 1 रुपया उत्पादन शुल्क

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला पूर्ण अर्थसंकल्प

एमपीसी न्यूज- पेट्रोल आणि डिझेलवर 1 रुपया उत्पादन शुल्क आकारण्यात येणार असल्यामुळे आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होऊ शकते. या वाढीमुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चाट बसणार असून, महागाई वाढण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारामन आज लोकसभेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी त्यांनी महत्वाच्या घोषणा केल्या. लोकसभा निवडणुकांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात मोदी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. आता आज सादर झालेल्या पूर्ण अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

वीज निर्मिती क्षेत्राला चालना, 2022 पर्यंत प्रत्येकाला पक्के घर देण्याचे उद्दिष्ट, पाच वर्षांत 1.25 लाख कोटींचे रस्ते बांधणार, किरकोळ व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना, महिला उद्योजकांना प्रोत्साहन, अशा महत्वाच्या घोषणा करीत भारतीय अर्थव्यवस्था 2025 पर्यंत 5 लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. त्याचप्रमाणे आता आधार कार्ड आणि पॅनकार्ड इंटरलिंक करण्यात येणार असून आता यापुढे आधार कार्डाद्वारे आयकर रिटर्न भरता येणार आहे. त्याचप्रमाणे जीएसटीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.

या अर्थसंकल्पाबाबतचे महत्वाचे अपडेट्स……..

# 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य

# वीज निर्मिती क्षेत्राला चालना देणार, वन नेशन वन ग्रीड

# सामाजिक संस्थांसाठी नवा शेअर बाजार उभारणार, नव्या शेअरबाजारासाठी सेबीकडे पाठपुरावा

# इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठी सूट देणारः

# राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेच्या रचनेत बदल करणार

# सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर अफोर्डेबल हाउसिंग योजना सुरू करणार

# किरकोळ व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना

# विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता

# रेल्वे रूळ बांधण्यासाठी पीपीपी मॉडेलला मंजुरी

# सरकारी जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री करणार

# गावातील प्रत्येक कुटुंबाला वीज आणि गॅस कनेक्शन देणार

# 2022 पर्यंत सर्व घरांना वीजपुरवठा

# पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1 कोटी 95 लाख घरे उभारणार

# विमान उद्योगात परदेशी गुंतवणूक वाढवणार

# 2022 पर्यंत प्रत्येकाला पक्के घर देण्याचे उद्दिष्ट

# अन्नदात्याला ऊर्जादाता बनवण्याचे लक्ष्य

# झिरो बजेट शेतीवर भर देणार

# बांबू, मध आणि खादीचे उत्पादन वाढविण्यावर भर

# कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांवर भर देणार

# जलजीवन योजना 2024 पर्यंत अमलात आणणार

# जलशक्ती मंत्रालय स्वतंत्र यंत्रणा उभारणार

# पंतप्रधान डिजिटल साक्षरता मिशनची गती वाढवणार

# मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी पायभूत सुविधांवर भर देणार

# पाच वर्षांत 1.25 लाख कोटींचे रस्ते बांधणार

# शिक्षण क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देणार

# अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील शिक्षणावर भर देणार

# परदेशी विद्यार्थ्यांना भारतामध्ये उच्च शिक्षण देण्याचे लक्ष्य

# फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प लवकरच पूर्ण होणार

# मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी पीपीपी मॉडेल राबवणार

# शहरांना जोडण्यासाठी उपनगरीय रेल्वेत अधिक गुंतवणूक करणार

# खेलो भारत योजने अंतर्गत खेळाडूंना प्रोत्साहन देणार

# उच्च शिक्षण संथांच्या विकासासाठी 400 कोटी

# स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनवरून विशेष कार्यक्रम सुरू करणार

# महिला उद्योजकांना प्रोत्साहन

# बचतगटामधील महिलांना मुद्रा योजनेचा लाभ मिळणार

# जागतिक दर्जाच्या 17 पर्यटनस्थळाचा विकास करणार

# चार नव्या देशात भारतीय दूतावास उभारणार

# सार्वजनिक बँकांना 70 हजार कोटी देणार

# अनिवासी भारतीयांनाही आधारकार्ड देणार

# मैलासफाईसाठी यांत्रिकीकरणाचा प्रस्ताव

# पुढील वर्षात पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

# 1 ते 20 रुपयांपर्यंतची नाणी बाजारात येणार, अंध लोकांनाही नाणी ओळखता येणार

# अपारंपरिक ऊर्जा वापरावर मोठी सूट

# इलेक्ट्रिक वाहन धारकांना करामध्ये दीड लाखांपर्यंत अतिरिक्त वजावट

# इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर केवळ 5 टक्के कर

# आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणार, आयटी रिटर्न भरताना आधार कार्ड देखील चालणार

# 400 कोटी उत्पन्न असलेल्या कंपन्यांना दिलासा. करमर्यादा 250 कोटीवरून 400 कोटी रुपये

# साडेतीन लाख रुपयांच्या कर्जावर कर नाही

# 5 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त

# 2-5 कोटी उत्पन्नावर 3 टक्के अतिरिक्त कर

# सोन्याच्या सीमाशुल्कात 2 टक्क्यांनी वाढ, सोने महागणार

# पेट्रोल व डिझेलवर 1 रुपया उत्पादन शुल्क, पेट्रोल डिझेल आज मध्यरात्रीपासून महागणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.