New Delhi : पंतप्रधान मोदी यांचा १४ एप्रिलला सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

एमपीसी न्यूज : लॉकडाऊन संपण्याची मुदत जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शनिवारी ( दि. ११ एप्रिल) देशातल्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते कोणती भूमिका मांडणार, या कडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

ANI या वृत्तवाहिनीने या बाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत करोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाउन पुकारण्यात आला. आता १४ एप्रिल ही तारीख जवळ आली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हा निर्णय नेमका कोणता असेल, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.