New Delhi: कोरोना संकटाबाबत पंतप्रधान मोदी आज रात्री करणार राष्ट्राला संबोधित

एमपीसी न्यूज – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) रात्री आठ वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. त्यात पंतप्रदान मोदी हे एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री देशाला संबोधणार आहेत. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती आहेत. तसेच मोदी एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार, याबाबत देशवासीयांमध्ये उत्सुकता आहे. आतापर्यंत देशात 151 कोरोनाग्रस्त आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने यांसदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मार्च 2020 रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ते कोरोना व्हायरस संबंधित मुद्दे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत.’

सध्या देशांत कोरोना बाधितांची संख्या वाढून 151 झाली आहे. त्यापैकी 25 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीन आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 45 कोरोना बाधित आहेत. तर महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रूग्ण केरळमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.