New Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा!

New Delhi: Prime Minister Narendra Modi wishes Muslims a happy Ramadan Eid!

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवारी) सकाळी ट्वीट करून देशातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शासनाच्या आवाहनानुसार मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचे सामुदायिक नमाजपठण टाळून आपापल्या घरी ईदची नमाज अदा केली. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यावेळी प्रथमच ईद वेगळ्या पद्धतीने साजरी केली जात आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मुस्लिम बांधवासाठी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, ‘ईद मुबारक! ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा! या विशेष प्रसंगी करुणा, बंधुता आणि सौहार्दाची भावना आणखी वाढावी. प्रत्येकजण निरोगी आणि समृद्ध होवो!’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.