New Delhi : रेल्वेची विशेष गाड्यांच्या तिकीट बुकिंगसाठी नवीन नियमावली जाहीर

0

एमपीसी न्यूज – भारतीय रेल्वे सध्या 12 मे 2020 पासून विशेष रेल्वे गाड्यांच्या 15 जोड्या चालवीत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी 15 जोड्यांच्या या विशेष रेल्वे गाड्यांच्या नियम आणि अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुधारित नियम आणि अटी खालीलप्रमाणे –

# या गाड्यांचा अगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) 7 दिवसांवरून वाढवून आता 30 दिवस करण्यात येणार आहे.

# या गाड्यांसाठी तात्काळ बुकिंगची सुविधा उपलब्ध नसेल.

# लागू असलेल्या नियमांनुसार या गाड्यांची आरएसी / प्रतीक्षा यादी तिकिटे दिली जातील. तथापि विद्यमान सूचनेनुसार प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

# पहिला चार्ट ट्रेन सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या कमीत कमी 4 तास आधी आणि दुसरा चार्ट ट्रेन सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या किमान 2 तास आधी तयार होईल. (पूर्वी हा चार्ट 30 मिनिट आधी तयार असायचा)

# प्रथम आणि द्वितीय चार्ट दरम्यान चालू (करंट) बुकिंग करण्याची परवानगी दिली जाईल.

# टपाल कार्यालये, यात्री सुविधा केंद्र (वायटीएसके), परवानाधारक इत्यादींसह संगणकीकृत पीआरएस काउंटरद्वारे तसेच आयआरसीटीसी आणि कॉमन सर्विस सेंटरच्या अधिकृत एजंटसह ऑनलाईन बुकिंगद्वारे तिकीट बुकिंगला परवानगी दिली जाईल.

# ट्रेनमधील आरक्षणासाठी वरील बदलांची अंमलबजावणी 24 मे 2020 पासून होईल आणि 31 मे 2020 रोजी किंवा त्यानंतर सुरू होणार्‍या गाड्यांना हे लागू होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like