New Delhi : उद्यापासून निवडक प्रवासी ट्रेन धावणार; आरक्षणासाठी संकेतस्थळ सुरू

एमपीसी न्यूज – निवडक रेल्वे वाहतूक मंगळवार ( दि.12) मेपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत नियोजन जाहीर केले आहे. सुरुवातीला कमी संख्येत रेल्वे गाड्या धावतील. यादरम्यान प्रवाशांची आरोग्य आणि कोरोना तपासणी केली जाईल. फक्त तिकीट निश्र्चित केलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. सोमवार (दि.11) रेल्वेचे आरक्षण सुरू होणार आहे.

मंगळवारी 12 मेपासून रेल्वे 15 पॅसेंजर ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या पॅसेंजर ट्रेन जोडीने चालवण्यात येतील, यानुसार ट्रेनच्या एकूण 30 फेऱ्या होतील. या गाड्या डिब्रुगढ, अगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमबादाबाद आणि जम्मू तवीला जाणाऱ्या आहेत. नवी दिल्लीवरून विशेष ट्रेनच्या स्वरूपात या गाड्या चालवल्या जातील.

_MPC_DIR_MPU_II

सर्व पॅसेंजर ट्रेन या एसी डब्यांच्या असतील. या गाड्यांना मर्यादित थांबे असतील. राजधानी रेल्वेच्या तिकीटाइतकेच तिकीट या गाड्यांसाठी असेल. म्हणजे प्रवाशांना तिकीटासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

या विशेष ट्रेनसाठी आजपासून (सोमवार) आरक्षण सुरू होणार आहे. प्रवाशांना तिकीट बुकींगसाठी IRCTC च्या https://www.irctc.co.in/ या संकेतस्थळावरून बुकिंग करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.