_MPC_DIR_MPU_III

New Delhi: देशात कोरोनाचा सातवा बळी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 75 वर!

एमपीसी न्यूज – कोरोनाला रोखण्यासाठी देशभर जनता कर्फ्यू पाळण्यात येत असतानाच आज (रविवारी) देशात कोरोनाबाधित तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची एकूण संख्या सात झाली आहे. मुंबईत आणखी एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 75 वर जाऊन पोहचली आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

आज मुंबई, पाटणा व सूरत या तीन ठिकाणी प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या चार वरून एकदम सात झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 341 झाली आहे.

मुंबईत आज सकाळपर्यंत सहा नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पुण्यातही चार नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यात दुपारी मुंबईत ऐरोली भागात आणखी एका रुग्णाची कोरोना निदान चाचणी पॉझिटीव्ह आल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 75 वर जाऊन पोहचली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.