New Delhi : विवाहबाह्य संबंध ठेवणे हा गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

व्यभिचाराला गुन्हा ठरवणारं कलम 497 रद्द

एमपीसी न्यूज- व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम 497 रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी दिला आहे. पुरुष आणि स्त्री दोन्ही समान आहेत. त्यामुळे विवाहबाह्य संबंधात पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही असे नमूद करून विवाहबाह्य संबंध (व्याभिचार) हा गुन्हा ठरत नाही. असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचिकाकर्त्याने हा कायदा घटनाबाह्य असल्याचे सांगत कलम 497 रद्द करण्याची मागणी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

व्यभिचार कायदा म्हणजे काय ?

विवाहित महिलेबरोबर तिच्या पतीच्या परवानगीशिवाय दुसऱ्या विवाहित पुरुषाने शारीरिक संबंध ठेवणे हे व्यभिचार कायद्याच्या कक्षेत येते. हा कायदा 158 वर्षे जुना होता. या कायद्यातील कलम 497 अनुसार दोषी विवाहित पुरुषाच्या विरोधात व्यभिचाराची तक्रार दाखल केली जाऊ शकते. केवळ पुरुषाला दोषी मानणाऱ्या आणि विवाहित महिलेला पीडित मानणाऱ्या कायद्याला बदलण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. इटलीत राहणाऱ्या एका भारतीयाने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.