New Delhi : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

एमपीसी न्यूज- माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज (वय 67) यांचं काल, मंगळवारी रात्री निधन झाल. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच सुषमा स्वराज यांची प्राणज्योत मालवली.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्या पश्चात पती स्वराज कौशल आणि कन्या बांसुरी आहेत. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्यात कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सर्वपक्षीय नेत्यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.