New Delhi : BSVI ची सुरुवात हे क्रांतीकारी पाऊल- प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज फेसबूकलाईव्हच्या माध्यमातून प्रदूषण आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपायांबाबत संवाद साधला. #AskPrakashJavadekar या हॅशटॅगच्या माध्यमातून संवाद साधत नागरिकांनी केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारले आणि काही उपाय सुचवले.

 

संवादादरम्यान प्रकाश जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी एक समग्र दृष्टीकोन जाहीर केला आहे, आणि राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या (एनसीएपी) माध्यमातून पर्यावरण मंत्रालय देशातील 122 शहरांमध्ये याची अंमलबजावणी करत आहे.   PM10 आणि PM2.5 मध्ये 2024 पर्यंत देशभरात 20 ते 30% नी कपात करण्याचे ध्येय आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले, संपूर्ण जगाला वायू प्रदूषणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. वायू प्रदूषणाच्या घटकांविषयी बोलताना जावडेकर म्हणाले की, भारतात वायू प्रदूषण प्रामुख्याने वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक उत्सर्जन, बांधकाम आणि इमारती पाडण्याचे कार्य, जैवकचरा (बायोमास) जाळणे, निकृष्ट कचरा व्यवस्थापन आणि पालापाचोळा जाळणे या माध्यमातून होते. जेंव्हा हे घटक भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय घटकांशी जोडले जातात तेंव्हा हिवाळ्यात उत्तर भारतातील प्रदूषणात वाढ होते.

मंत्र्यांनी सांगितले की, वायू प्रदूषणा विरोधात केंद्र सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. स्वच्छ हवेच्या दिनमानात वाढ झाली आहे, 2016 मध्ये 106 दिनमान होते ते 2020 मध्ये 218 एवढे झाले आहेत आणि खराब हवा दिनमानात घट होऊन 2020 मध्ये 56 झाले आहेत, जे 2016 च्या जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान 156 होते.

एप्रिल 2020 पासून देशभरात वाहनांसाठी BS VI निकषांची सुरुवात करणे हे वाहन प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल आहे, मंत्र्यांनी सांगितले की, BS VI मुळे वाहन प्रदूषणात घट झाली आहे. BS VI इंधन डिझेल कारमधील नायट्रोजन ऑक्साईड (NOx) उत्सर्जन 70% नी कमी करते, पेट्रोल कारमधील 25% नी कमी करते आणि वाहनांच्या माध्यमातून हवेत पसरणाऱ्या घन किंवा द्रव कणात (PM) 80% नी कपात करते.

ईस्टर्न आणि वेस्टर्न परिघीय एक्सप्रेसवे कार्यान्वयीत झाल्यामुळे दिल्लीतील वाहतुक वळवून गर्दी कमी झाली आहे. नागरिकांनी वैयक्तिक वाहनांचा कमी वापर करुन मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करण्याचे आवाहन जावडेकर यांनी केले. मेट्रोच्या विस्तारामुळे गर्दी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत झाली आहे, असे ते म्हणाले. मेट्रोची अधिक स्थानके आणि डब्यांची संख्या वाढवल्यामुळे 5 लाख वाहनांच्या प्रदूषणाला आळा बसला आहे.

बदरपूर आणि सोनीपूर औष्णिक वीज प्रकल्प बंद करण्याबरोबरच प्रदूषण कमी करण्यासाठी घेण्यात आलेल्या इतर उपायांची पर्यावरण मंत्र्यांनी माहिती दिली. यामध्ये वीटभट्ट्यांवर झिग झॅग तंत्रज्ञानाचा वापर, 2800 उद्योगांमध्ये पीएनजी इंधनाचा वापर तसेच पेट्रोल कोळसा आणि फर्नेस इंधनावर बंदी यांचा यात समावेश आहे.

यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर ॲपची माहिती देऊन नागरिकांना ते डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. हे ॲप  शहरांतील अती प्रदूषित भागांची माहिती देते आणि नागरिकांना सजग करते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.