New Delhi: भारतात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 258 वर, मृतांची संख्या 4

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 258 वर जाऊन पोहचला आहे. यात 39 परदेशी रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा एकूण आकडा 4 झाला आहे. देशातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून शनिवारी सकाळपर्यंत त्यांची संख्या 64 होती. पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत एकूण 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पुण्यात ‘लॉक डाऊन’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (रविवारी)  सकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान देशभर ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना घाबरून न जाता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संघर्ष करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

संबंधित आणखी बातम्या

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.