FM Nirmala Sitharaman Press Conference: कृषी क्षेत्रातील पायाभूत सेवा सुविधांच्या विकासासाठी एक लाख कोटी

New Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman's 11 important announcements for farmers and agro-industries

एमपीसी न्यूज – शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचे पॅकेज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवारी) जाहीर केले. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेक उपाय योजना करण्यात आल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. दोन महिन्यात म्हणजेच लॉकडाऊनच्या काळात 74 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची धान्य खरेदी करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. शेतीमाल कोणालाही विकण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना राहील तसेच पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाची हमी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यात कोणत्या क्षेत्राला काय मिळाले याच्या घोषणा तीन दिवस करण्यात येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेचा आजचा तिसरा दिवस होता. पत्रकार परिषदेस अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर हेही उपस्थित होते.

कृषी क्षेत्राशी संबंधित 11 महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. पायाभूत सुविधा मजबूत करण्यासंबंधी यातील आठ घोषणा करण्यात आल्या. प्रशासकीय सुधारणांसंबंधी तीन घोषणा करण्यात आल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • कृषी क्षेत्रातील पायाभूत सेवा सुविधांच्या विकासासाठी १ लाख कोटी
  • देशातील २ कोटी शेतकऱ्यांच्या व्याजावर सबसिडी
  • शेतीमाल कोणालाही विकण्याचे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य
  • पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाची हमी देण्याचा प्रयत्न
  • योग्य किंमतीत शेतीमाल विकण्यासाठी नवा कायदा
  • कृषी क्षेत्राच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल
  • शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कायदा
  • अत्यावश्यक सेवा कायद्यात छोटा बदल, अत्यावश्यक सेवा कायदा 1955 पासून लागू
  • लॉकडाऊनमध्ये भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’
  • भाजीपाला वाहतुकीवर व शीतगृह खर्चावर 50 टक्के सबसिडी
  • पशुपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी 15 हजार कोटींची तरतूद
  • पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी 13 हजार 343 कोटींची तरतूद
  • मधमाशी पालन व्यवसायासाठी 500 कोटींची योजना, शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे अतिरिक्त साधन.
  • दुग्ध व्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटी
  • पुढील पाच वर्षात 70 लाख टन मत्स्य उत्पादनाचे लक्ष्य , 55 लाख रोजगार, दुप्पट निर्यात होणार
  • समुद्री आणि आंतर्देशीय मत्स्य पालनासाठी 11 हजार कोटी , अंतगर्त सुविधेसाठी 9 हजार कोटी
  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी 20 हजार कोटींची घोषणा
  • फूड इंडस्ट्रीजसाठी 10 हजार कोटींचा निधी, स्वदेशी उत्पादनाला क्लस्टरमधून चालना
  • पीक विमान योजनेअंतर्गत 6 हजार 400 कोटींचे वितरण
  • शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 18,700 कोटी रुपये जमा केले
  • लॉकडाउनच्या काळात एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमतीवर 74,300 कोटी रुपयांच्या शेती मालाची खरेदी केली.
  • पीएम किसान फंडातंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 18,700 कोटी रुपये जमा केले.
  • 560 लाख लिटर दूध खरेदी, लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादकांना 4000 कोटींपेक्षा अधिक रक्कम दिली. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.