New Delhi: जागतिक बँकेकडून भारताला 100 कोटी अमेरिकन डॉलरचे आपत्कालीन अर्थसहाय्य

एमपीसी न्यूज – कोरोना जागतिक महामारीच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी जागतिक बँकेने भारताला 100 कोटी अमेरिकन डॉलर्सचे आपत्कालीन अर्थय़सहाय्य मंजूर केले आहे. 

जागात कोरोनाच्या साथीने थैमान घातले असून जगात 10 लाखपेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून आतापर्यंत 50 हजार लोकांचा या संसर्गजन्य रोगाने बळी घेतला आहे. या पार्श्वभूमी प्रभावी उपाययोजना करीत भारताने कोरोनाची साथ बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले आहे. भारताच्या या प्रयत्नांची दखल घेत जागतिक बँकेने भारताला आपत्कालीन अर्थसहाय्य मंजूर केले आहे.

या निधीतून कोरोना संशयितांच्या चाचण्या, संपर्कातील लोकांचा शोध, कोरोना निदान अधिक चांगल्या पद्धतीने करता यावे, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांची (पीपीई) खरेदी तसेच नवीन आयसोलेशन वॉर्डची उभारणी अशी कामे करणे अपेक्षित आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी भारतातील उद्योजक, व्यावसायिक तसेच दानशूर लोकांकडून मदतीचा ओघ सुरू झालेला असतानाच जागतिक बँकेनेही आपत्कालीन अर्थसहाय्य मंजूर करून मदतीचा हात पुढे केला आहे. 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत येण्याचा धोका आहे. त्यातून सावरण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.