New Delhi: कोरोना ही विश्वव्यापी साथ, जागितक आरोग्य संघटनेची घोषणा

एमपीसी न्यूज – सुमारे 114 देशांमधील सव्वा लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाला जागतिक साथ किंवा विश्वव्यापी साथ (Pandemic) म्हणून घोषित केले आहे.

चीनच्या वुहान शहरात एका व्यक्तीने जंगली जनावराचे मांस खाल्ले व त्यातून कोरोनाचा विषाणू आल्याचे व त्यानंतर या विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्याचे सांगितले जाते. जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने आत्तापर्यंत तीन हजार 200 च्या जवळपास लोकांचा बळी घेतला आहे. सुमारे 114 देशांमधील सव्वा लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ या जागतिक संघटनेने कोरोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित केलं आहे. भारतात आतापर्यंत 62 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयाकडून खबरदारीचा उपाय म्हणून फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना भारताचा व्हिसा 15 एप्रिलपर्यंत तरी व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चाललाय. आतापर्यंत देशात कोरोनाचे 62 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 16 परदेशी पर्यटाकांचा समावेश आहे. केरळमध्ये सर्वाधिक 17 कोरोनाग्रस्त असून त्याखालोखाल हरियाणा 14, उत्तरप्रदेश 9 आणि महाराष्ट्रातील 11 जणांचा समावेश आहे. तर दिल्ली 4 आणि राजस्थानात 3 रुग्ण आढळून आले आहे. या सर्वांवर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like