_MPC_DIR_MPU_III

New Delhi : Xiaomi चा 108 मेगापिक्सेल कॅमेऱ्याचा ‘Mi 10’ smartphone भारतात लाँच

Xiaomi launches Mi 10 with 108MP camera in India. 'शाओमी'ने 108 मेगापिक्सेल कॅमेऱ्याचा  'Mi 10' हा नवीन स्मार्टफोन आज ( शुक्रवार) एक ऑनलाईन इव्हेंटमध्ये भारतात लाँच करण्यात आला.

नवी दिल्ली : चीनची आघाडीची स्मार्टफोन कंपनी ‘शाओमी’ने 108 मेगापिक्सेल कॅमेऱ्याचा  ‘Mi 10’ हा नवीन स्मार्टफोन आज ( शुक्रवार) एक ऑनलाईन इव्हेंटमध्ये भारतात लाँच करण्यात आला. कोरोनामुळे या फोनचे सादरीकरण पुढे ढकलण्यात आले होते. भारतात दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध करण्यात आला असून, त्याची किंमत अनुक्रमे 49,999 आणि 54,999 असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

फेब्रुवारी महिन्यात शाओमीने हा फोन चीनमध्ये सादर केला होता. त्यानंतर आता 31 मार्चला हा फोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येणार असल्याचे शाओमीकडून सांगण्यात आले. मात्र,भारतातील कोरोनाचे आक्रमण आणि त्यानंतर लागू केलेला लॉकडाऊन यामुळे कंपनीने ‘Mi 10’चे लाँचिंग पुढे ढकलले होते.

_MPC_DIR_MPU_II

आज ( शुक्रवारी) दुपारी शाओमीच्या सोशल मीडिया चॅनेल आणि मीडॉटकॉमवर लाईव्ह इव्हेंटद्वारे या फोनचे लाँचिंग करण्यात आले. हा लाँचिंग सोहळा शाओमीच्या सोशल मीडिया चॅनेल आणि मीडॉटकॉमवर पाहता येईल.

Xiaomi Mi 10 या स्मार्टफोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चा दमदार प्रोसेसर आहे. 6.67 इंच फुल एचडी + एमोलेडे डिस्प्ले, 4 रिअर कॅमेऱ्याचाही समावेश आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 108  मेगापिक्सेलचा असून, तो 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सेलचा आहे.

या फोनची बॅटरी 4780mah क्षमतेची असून, ती 30 w फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.  हा अँड्रॉइड स्मार्टफोन 10 बेस्ड मीयुआई 11 वर कार्य करतो. यामध्ये 8 जीबी रॅम आणि प्लस 128 जीबी स्टोरेज आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.