Pimpri : आचार्य अत्रे नाट्यगृहात 21 जुलैला सौंदर्य साम्राज्ञी जिल्हास्तरीय स्पर्धा

एमपीसी न्यूज – खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य,  साँस्कृतिक कला – क्रीडा मंच पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी २०१९” या  पुणे सौंदर्य साम्राज्ञी जिल्हास्तरीय भव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती विजया मानमोडे यांनी दिली.

पिंपरीतील आचार्य अत्रे नाट्यगृहात रविवार (दि.२१ जुलै) सकाळी साडेअकरा वाजता आयोजन केले आहे. मराठमोळी संकल्पना असलेली, मराठी बोली भाषा आणि आपली साहित्य कला वस्त्र संस्कृती संवर्धन व प्रचार प्रसार करणारी राज्यातली ही प्रथम सौंदर्य स्पर्धा मागील वर्षी १८ जिल्ह्यातून यशस्वी पणे राबविली. आता २०१९ हे दुसरे पर्व आहे. या वर्षी एकूण १४ जिल्ह्यात ही स्पर्धा होत आहे व सर्व जिल्हास्तरीय विजेत्यांची महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी २०१९ ची महा अंतिम प्रतियोगिता सोहळा होईल. ज्यात कुमारी आणि सौभाग्यवती गटातील विजेत्या महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञींना दोन लाख रुपयाची बक्षिसे विभागून देण्यात येईल.

पुणे जिल्हास्तरीय भव्य प्रतियोगिताची निवड फेरी रविवार (दि. १४ जुलै) सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत हॉटेल क्रिस्टल कोर्ट येथे घेण्यात येत आहे व दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत मुख्य स्पधेसाठीची कार्यशाळा आचार्य अत्रे नाट्यगृहात आयोजन आहे. तरी आपल्या मराठी महिलांना, युवतींना सौंदर्य क्षेत्रात ही निर्धास्तपणे सहभाग घेऊन आपले कलागुण, कौशल्य दाखविण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ मिळावे हा हेतु आहे. पुणे जिल्ह्यातील महिला व तरुणींनी जास्तीत जास्त संख्येत सहभागी होऊन आपल्या मराठी संस्कृतीचा ठसा उमटावावा, असे आवाहन आयोजक व अध्यक्षा विजया सुरेश मानमोडे यांनी केले आहे.

ही स्पर्धा महिला व मुली अशा दोन गटात होणार असून १७ वर्षांच्या पुढील वयोगट यामधे सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी करीता संपर्क विजया सुरेश मानमोडे – ९८२३११३१७७, मृणाल गायकवाड – ९००४०६६६८८, डॉ. सारीका सावंत -७०५७२२४४६६.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.