Pune : डीएसके यांच्या 13 आलिशान गाड्यांच्या लिलावाला न्यायालयाची परवानगी

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या 13 आलिशान गाड्यांचा लिलाव करण्यास न्यायालायचने परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधीश ए.एस. भैसारे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.   

यामध्ये टोयोटो इनोव्हाच्या 5 गाड्या, टोयोटो इरटॉस, टोयोटो क्वालिस, सेन्ट्रो कार, दोन बीएमडब्ल्यू कार, एक सॅन्ट्रो कारचा समावेश आहे.

डीएसके दाम्पत्यांना गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 17 फेब्रुवारी 2018 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर उत्तरोत्तर याप्रकणी डीएसके यांच्या अडचणी वाढतच गेल्या. तब्बल अडीचहजार गुंतवणूकदारांनी डीसके यांच्यावर 230 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.