BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत रंगले माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन

शाळेच्या दिवसांत रमले माजी विद्यार्थी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेच्या वतीने १९८०-८१ च्या तुकडी अ च्या माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले.

शाळांचे दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शाळा सुटली तरी शाळेच्या आणि सोबत्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम रुंजी घालते. त्यामुळेच शाळा सुटली तरी सोबत्यांची साथ कायम असते. हे माजी विद्यार्थी एकत्र आले आणि शाळेच्या आठवणींमध्ये रमून गेले होते. शाळेचे मंतरलेले दिवस आठवून पुन: प्रत्ययाचा आनंद प्रत्येक जण घेत होता. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच सध्या आपल्या आयुष्यात काय चालले आहे. हे एकमेकांना सांगताना गप्पा रंगत गेल्या.

शिक्षकांमध्ये कोंडीभाऊ विठोबा टिकेकर, शंकर कुचीक, सुरेखा साखळकर, शर्मिला जोशी, दत्तात्रय थोरात, अनंत रेडकर, बंडोपंत पाटील, सुरेखा माचनुरकर, सुरेश जैसवाल तर मुले राजेंद्र शहा, दीपक जुंदरे, विश्वास टोंगळे, यतिन शहा, राजू काळोखे, विश्वनाथ मराठे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे संयोजन हे राजेंद्र शहा, बाबा काळोखे, यतिम शहा, दीपक जुंदरे,  विश्वास टोंगळे, विश्वनाथ मराठे यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3