Technology News : युट्यूबमध्ये लवकरच येणार ‘हे’ फिचर

एमपीसी न्यूज : युट्यूब हे एका नवीन फिचरचे टेस्टिंग करत आहे. हे फीचर म्हणजे आता व्हिडीओ बघता बघता वापरकर्ता लगेच शॉपिंग करू शकणार आहे. या नवीन फीचरची माहिती गुगलने त्यांच्या सपोर्ट पृष्ठावर दिली आहे.

या फिचरमुळे आता व्हिडीओजच्या खाली डाव्या बाजूला एका शॉपिंग बॅगचे चिन्ह दिसणार आहे. यावर क्लिक करून वापरकर्ता व्हिडीओमध्ये दाखवले जाणारे उत्पादन लगेच खरेदी करू शकणार आहे. यामुळे विविध कंटेट क्रिएटर्स त्यांच्या व्हिडीओजमध्ये उत्पादने जोडू शकणार आहेत. त्यामुळे  वापरकर्त्याला यापुढे शॉपिंगसाठी वेगळ्या संकेतस्थळांवर जाऊन उत्पादन सर्च करण्याची गरज नसेल.

सध्या विविध चॅनल्सच्या डिस्क्रीप्शन बॉक्समध्ये उत्पादनांच्या लिंक्स दिलेल्या असतात. पण आता या आयकॉनमुळे थेट उत्पादनापाशी सहजपणे पोहोचता येणार आहे. अमेरिकेत ठराविक ॲड्रोइड, आयओएस व वेब प्रणालींवर याचे टेस्टींग अजून चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.