Pimpri : शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यावरील नामफलकाकडे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या महापालिकेसमोरील पुतळ्यावरील नामफलकाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.  पुतळ्यावरील अक्षरांना नियमित चकाकी केली जात नसल्याने अण्णासाहेब मगर यांचे नाव योग्य पद्धतीने झळकत नाही. त्यामुळे शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर होते. त्यांना शहराचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी शहराची उभारणी केली. शहराचे पहिले नगराध्यक्ष असलेल्या अण्णासाहेब मगर यांचा पुतळा महापालिकेच्या इमारती समोर दिमाखात उभा आहे. मात्र, त्यांच्या नामफलकाकडे महापालिकेचे दुर्लक्ष असते. या अक्षरांना नियमित चकाकी केली जात नाही. त्यामुळे अण्णासाहेब मगर यांचे नाव योग्य पद्धतीने झळकत नाही.

त्यांच्या पुतळ्याला घातलेला पुष्पहार कधीचा असेल हा वेगळाच प्रश्न आहे. हार वाळून गेला आहे. तसेच असे वाळलेले हार केवळ याच नव्हे तर शहरातील अन्य पुतळ्यांवरही महिनोनमहिने दिसतात. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like