BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : बाप्पाच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज

एमपीसी न्यूज – आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी परिसर सज्ज झाला आहे. जिल्हाभरात गणेशभक्तांनी बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे. यासाठी लहानांपासून तर थेट ज्येष्ठांपर्यंत बाप्पांच्या मूर्तींसाठी बाजारात दाखल झाले आहेत. गणेशाच्या मूर्तीसोबत मंडप सजावटीच्या वस्तूंनाही मागणी वाढली आहे. बाजारात खरेदीने वेग घेतला असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

बाप्पाचे आगमन होणार असल्याने शहरातील बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी सराफ बाजार, काही दिवसांपासून गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. गणेश मंडळानी उत्सवाची तयारी पूर्ण केली असून विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज झाले आहे. अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर चौकाचौकात मंडप सजले असून गणेश मंडळानी उत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. आरास, देखावे तयार करण्याला वेग देण्यात आला आहे. मूर्तींबरोबरच पूजेचे सामान, पाट, वस्त्रे याचीही दुकाने लागली आहेत. घरातील मंडळी विशेषत: महिलावर्ग घरांची साफसफाई, रंगरंगोटी करण्यात गुंतलेल्या आहेत. मखर, विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी कागदांनी, चमेली कंदील दंडी वगैरे साहित्याने गणपती स्थानापन्न होणारी खोली सजविण्याची लगबग ही वेगळीच असते. कुटुंबातील सर्वच आबालवृद्ध, महिला, तरुण उत्साहाने बाप्पाच्या तयारीमध्ये गुंतलेले आहेत.

बाजारपेठेत विविध आकारांतील रंगातील गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात कृष्णावतार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषातील गणेशमूर्तीचा समावेश आहे. शिवाय जास्वंद फूल. पान, शंख, चौरंग, सूर्यफूल अशा प्रकारातील विविधरंगी गणेश मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. बाजारपेठेत गणरायाच्या मूर्ती विविध आकर्षक लुकमध्ये विक्रीस दाखल झाल्या आहेत. आसन दोनशे रुपयांपासून पुढे त्याचबरोबर खास फेटा, नक्षीकाम केलेले उपकरणे, विविध प्रकारचे मुकुट असे सुंदर दागिने विक्रीस आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.