New Interview Series : मला काही सांगायचंय…!

एमपीसी न्यूज – आपल्या अवतीभोवती खूप वेळा अशी माणसं असतात की, ज्यांनी काहीतरी  एकदम  ‘भारी’ म्हणजे ग्रेट करून दाखवलंय आणि करतही  आहेत. पण बऱ्याचदा आपणाला त्यांच्याबद्दल माहिती नसते. त्यांचं म्हणून पण काहीतरी सांगणं  असतं. काही सुखद असतं, काहीतरी टोचत पण असतं… 

बऱ्याचदा  आपल्याजवळच सहज उपलब्ध होणारी ही ग्रेट माणसं आपल्याला नवी ऊर्जा, बळ देऊन जातात. बऱ्याच वेळेला आपण पहातो की, युवा पिढीला हे रियल हिरोज माहीतच नसतात.

हाच धागा  पकडून एमपीसी न्यूज  व देवदत्त फोटोग्राफी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करत  आहोत, अशाच ग्रेट माणसांसोबत मनमोकळ्या गप्पांची एक शृंखला… ‘मला काही सांगायचंय…’

नामवंत छायाचित्रकार व मुक्त पत्रकार देवदत्त  कशाळीकर हे या मुलाखती घेणार असून येत्या 10 एप्रिलपासून आपल्या mpcnews.in या न्यूज पोर्टलवर तसेच देवदत्त फोटोग्राफी [devdatta photography] या यूट्यूब चॅनेलवर त्या सर्वांना पाहता येणार आहे.

‘मला काही सांगायचंय…’ या मालिकेतील सर्व मुलाखतींच्या लिंक ‘एमपीसी न्यूज’च्या फेसबुक पेज, टेलिग्राम चॅनेल, ट्विटर हँडलवरही उपलब्ध असतील. तर पाहायला विसरू नका… ‘मला काही सांगायचंय…!’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.