Pune : ‘पीएमपीएमएल’ संचालक पद काकडे गटाला

एमपीसी न्यूज – राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे गटाला ‘पीएमपीएमएल’चे संचालक पद मिळणार असल्याची महापालिकेत चर्चा आहे. स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता पदासाठी काकडे गट आग्रही होता. मात्र, पक्षाने धीरज घाटे आणि हेमंत रासणे यांना या पदावर काम करण्याची संधी दिली.

खासदार गिरीश बापट नगरसेवक महेश लडकत यांच्यासाठी आग्रही होते. पक्षाने बापट यांना धक्का देत घाटे यांची निवड केली. हे दोघेही कसबा मतदारसंघात प्रबळ इच्छुक होते. भाजपने मात्र माजी महापौर मुक्ता टिळक यांना संधी दिली. त्यामुळे घाटे आणि रासणे यांची नाराजी दूर करीत त्यांना आज महत्वाची पदे दिली.

काकडे गटाला ‘पीएमपीएमएल’ संचालकपद देण्याचे निश्चित झाले होते. तशी आज घोषणाही करण्यात येणार होती. पण, इच्छुक नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा आहे. यावर अंतिम निर्णय संजयनाना काकडे घेणार असल्याची कुजबूज आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात येणार आहे. या पदासाठी नगरसेवक शंकर पवार, प्रवीण चोरबेले यांची नावे चर्चेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.