Pune : कोथरूड श्री 2020 चा मानकरी महेश जाधव

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी – ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट, कोथरुड विधानसभा मतदार संघ आयोजित बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिजिक स्पोर्ट असोसिअशन पुणे-पिंपरी चिंचवड यांच्या मान्यतेने “कोथरुड श्री २०२०” भव्य शरीरसौष्ठव स्पर्धाचे आयोजन कोथरुड येथील कर्वेनगर परिसरामध्ये करण्यात आले होते. कोथरुड श्री २०२० चा मानकरी महेश जाधव यांनी पटकवले. ते अजिंक्य जिमचे बॉडी बिल्डर आहेत. त्यांना ‘टू’ व्हिलर गाडी देण्यात आली.

“कोथरुड श्री” उपविजेता मल्लेश धनगर यांनी मिळाले. मल्लेश लहूजी वस्ताद व्यायाम शाळेमधील बिल्डर आहेत. या उपविजेतास रोख रक्कम १०,००० रूपये रकमेचे बक्षिस, मेडल, सर्टीफिकेट व ट्रॉफी देण्यात आली. शरीरसौष्ठव स्पर्धेकरिता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सूळे उपस्थित होत्या. या स्पर्धेचे मुख्य आयोजन व संयोजन नगरसेविका लक्ष्मी दूधाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दूधाने व त्यांच्या सर्व मित्र परिवाराने केले होते.

भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा जिल्हास्तरीय स्तरावर घेण्यात आल्या होत्या. तसेच स्पर्धामधील मुख्य विजेत्यास “कोथरुड श्री २०२०“ टायटल अंतर्गत अक्टिवा-होंडा ही गाडी देण्यात आली. तसेच रोख रक्कमेची अडीच लाख (२.५ लाख ) रूपये हे इतर विजेत्याना देण्यात आली. स्पर्धा एकूण सात वजनी गटामध्ये घेण्यात (55kg, 60kg, 65kg, 70kg, 75kg, 80kg, above 80kg) व मेन्स फिजिक या गटांमध्ये घेण्यात आली. या सर्व गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेतांची अंतिम फेरी घेऊन या मधून “कोथरुड श्री” विजेता निवडण्यात आला.

५५किलो गटामध्ये = प्रथम क्रमांक • मोसिन शेख- (रोख बक्षीस १०,००० रूपये+मेडल) द्वितीय क्रमांक = ज्ञानेश्वर सोनवाने
(रोख बक्षीस ५,००० रूपये+ मेडल) तृतीय क्रमांक = सोमनाथ पाल
(रोख बक्षीस ४०००रूपये +मेडल)
६० किलो गटामध्ये = प्रथम क्रमांक हर्षल काटे
-( रोख बक्षीस १०,००० रूपये+मेडल)  द्वितीय क्रमांक = योगेश धिमटे
(रोख बक्षीस ५,००० रूपये+ मेडल)
तृतीय क्रमांक = अरबाज़ शेख
(रोख बक्षीस ४०००रूपये +मेडल)

६५ किलो गटामध्ये -प्रथम क्रमांक- मंगेश बेट – ( रोख बक्षीस १०,००० रूपये+मेडल)
द्वितीय क्रमांक -अमोल कामटे (रोख बक्षीस ५,००० रूपये+ मेडल)
तृतीय क्रमांक -अविनाश रासगे (रोख बक्षीस ४०००रूपये +मेडल) ७० किलो गटामध्ये -प्रथम क्रमांक-तौसिफ मोमिन – ( रोख बक्षीस १०,००० रूपये+मेडल)

द्वितीय क्रमांक -सचिन शिंदे (रोख बक्षीस ५,००० रूपये+ मेडल)  तृतीय क्रमांक – करण जांभळे (रोख बक्षीस ४०००रूपये +मेडल) ७५किलो गटामध्ये -प्रथम क्रमांक- नुशाद शेख – ( रोख बक्षीस १०,००० रूपये+मेडल)  द्वितीय क्रमांक -अजय सोनवाने (रोख बक्षीस ५,००० रूपये+ मेडल) तृतीय क्रमांक – मिथून ठाकूर (रोख बक्षीस ४००० रूपये +मेडल) ८० किलो गटामध्ये -प्रथम क्रमांक- महेश जाधव- (रोख बक्षीस १०,००० रूपये+मेडल) द्वितीय क्रमांक -राजू भडाळे (रोख बक्षीस ५,००० रूपये+ मेडल) तृतीय क्रमांक – शरीफ मुलानी (रोख बक्षीस ४००० रूपये +मेडल) ८० above किलो गटामध्ये -प्रथम क्रमांक-मल्लेश धनगर – ( रोख बक्षीस १०,००० रूपये+मेडल) द्वितीय क्रमांक -रोहितेश मांजरेकर (रोख बक्षीस ५,००० रूपये+ मेडल) तृतीय क्रमांक – शिवा बिराजदर(रोख बक्षीस ४००० रूपये +मेडल)

स्पर्धे मध्ये वर्ल्ड चॅम्पीयन – बॉडी बिल्डर महेंद्र चव्हाण यांचा विशेष सत्कार या ठिकाणी आयोजकांतर्फे करण्यात आला. कार्यक्रमास पुणे शहरातील अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

शरीरसौष्ठव स्पर्धेकरिता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सूळे यांनी स्पर्धेनिमित्त तरुणांना शरीराबाबत काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक दिलीपभाऊ बराटे, पुणे महानगरपालिकेच्या विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके,

महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी नगरसेवक नगरसेवक राजाभाऊ गोरडे, पुणे शहर उपाध्यक्ष रा.का. पार्टीचे आनंद ताबे, चित्रसेनदादा खिलारे, हर्षवर्धन मानकर, कोथरुड विधानसभा कार्याध्यक्ष नितिन कळमकर, मिलिंद वालवडकर, बाबा खान, डॉ .राजेंद्र खेड़ेकर, शशिकांत कांबळे, दीपक बेलदरे, देवेन सुर्यवंशी, विजय दूधाने, मयूर दूधाने, संतोष आप्पा मोहळ, प्रमोद शिंदे, अमर सुतार, विष्णु सरगर हे उपस्थित होते तसेच बाॅडी बिल्डिंग ॲण्ड फिजिक स्पोर्ट असोसिअशन पुणे जिल्हाचे शरद मारने, महेश गणगे, दिलीप धुमाळ, मयूर मेहेर, राम बराटे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2