Pune : हि-यांच्या दागिन्यांचा अपहार करून फरार झालेला मॅनेजर जेरबंद

तेवीस लाखांचा ऐवज हस्तगत

एमपीसी न्यूज – पुण्यातील रियल डायमंड अँड कंपनी शोरुम मधील मार्केटिंग मॅनेजर 33 लाख रुपयांच्या हि-यांच्या दागिन्याचा अपहार करून फरार झाला होता. याप्रकरणी गिता नहार (वय 50, मुकूंदनगर, पुणे) यांनी याविषयी 30 ऑगस्ट 2018 रोजी फिर्याद दिली होती. तेव्हापासून पोलीस मॅनेजरचा शोध घेत होते. त्याला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना यश आले आहे. युनिट तीनच्या पोलिसांनी आरोपीला बडोदा गुजरात येथून अटक केली. त्याच्याकडून तेवीस लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

मयूर शहा, (वय 47) असे या अटक आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी नहार यांनी आरोपी शहा याच्याकडे 39 लाख 55 हजार रुपयांचे हि-याचे दागिने हॉल मार्किंगसाठी व लॅब तपासणीकरिता दिले होते. मात्र, हे दागिने परत न करता आरोपी शहा याने त्यांचा परस्पर अपघार केला. त्यानंतर विषबाधा झाल्याचा बनाव करून तो पळून गेला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस कर्मचारी किशोर शिंदे व मेहबुब मोकाशी यांना त्यांच्या खब-याकडून माहिती मिळाली की आरोपी शहा हा गुजरातमधील बडोदा येथील सुभानपूरा येथे आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बडोदा येथे जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केले. अपहार केलेले दागिने मुंबई व पुणे येथील दुकानदारांना विकले. पोलिसांनी मुंबई, पुणे येथे तपास करून त्याच्याकडून एकूण 22 लाख 90 हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले. दरम्यान, आरोपीला पोलीस कोठडी मिळाली असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.