Kisse Bahaddar: आता ऐकू या भन्नाट ‘किस्से’ स्वत: कलाकारांकडूनच…

new marathi entertainment show kisse bahaddar on youTube

एमपीसी न्यूज- लॉकडाउनमुळे सध्या चित्रीकरण होत नसल्याने विविध वाहिन्यांवरील मालिका बंद आहेत. त्यांचे रिपीट टेलिकास्ट बघून प्रेक्षक कंटाळले आहेत. अशावेळी काहीतरी वेगळं, मनोरंजक, मसालेदार सादर करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु आहे. याच जाणिवेने आता ‘किस्से बहाद्दर’ या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना नाटकाच्या पडद्यामागील कलाकारांचे भन्नाट किस्से ऐकता येणार आहेत.

बऱ्याच वेळा नाटकाच्या प्रयोगादरम्यान, तालमींच्यावेळी किंवा पडद्यामागे कलाकारांचे भन्नाट किस्से घडत असतात. त्यांच्यातही अनेक विनोद, मज्जा, मस्करी होत असते. हे खमंग आणि रंजक किस्से विविध कलाकार आता ‘किस्से बहाद्दर’च्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी त्यांच्या काही आठवणी आणि मजेदार किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

विप्लवा एंटरटेनमेंटस् आणि पॅलेट मोशन पिक्चर्सनिर्मिती हे भन्नाट किस्से प्रेक्षकांना ‘स्वरंग मराठी’ या वाहिनीवर पाहता येणार आहे. हे किस्से रंजक बनवण्यासाठी मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गज कलावंत यात सहभागी झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेते संजय मोने, शरद पोंक्षे, विजय कदम, मंगेश कदम, लीना भागवत, शर्वाणी पिल्ले, अविनाश नारकर, तसेच युवा पिढीतील अभिनेत्री भार्गवी चिरमुले, श्रुजा प्रभुदेसाई, ऋतुजा बागवे, अभिनेता शशांक केतकर आदी कलाकारांनी आपल्या या किश्शांच्या आठवणी दर्शकांशी शेअर केल्या आहेत. सचिन सुरेशने सूत्रसंचालन केलं असून कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन सुश्रुत भागवतने केलं आहे. दरम्यान, हा कार्यक्रम स्वरंग मराठीच्या युट्यूब चॅनेल आणि सोशल मीडियावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like