New Marathi Song: ‘दाट धुक्याच्या’ गाण्याचं संगीत मंत्रमुग्ध करणारे

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) – नामवंत गायक आणि अभिनेता अभिषेक अवचट आणि त्याच्या तितक्याच कलात्मक टीमने एक नवं कोरं आणि तितकंच ताजं गाणं रसिकांच्या भेटीला आणले आहे “दाट धुक्याच्या”!

 सध्याच्या या नकारात्मक वातावरणात काहीतरी होकारात्मक, धुंद करणार, जगायला छान प्रेरणा देणाऱ्या सुरेल गाण्याची निर्मिती केली आहे, हे गाणे जितके ऐकायला सुरेल आहे तितकंच त्याचे चित्रणही तितकंच खुमासदार झाले आहे.

या विडीयो चे दिग्दर्शन केले आहे सुप्रसिद्ध सिने आणि नाट्य अभिनेत्री माधुरी जोशी-अवचट यांनी, तर याची निर्मिती केली आहे स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानने आणि प्रसिद्ध गायिका सुचेता अवचट यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

अजिंक्य कुलकर्णी यांनी तर गीत लिहिले आहे करिश्मा सुराना यांनी … गिटार आणि की-बोर्ड वाजवला आहे वैभव मोने, चिन्मय खरे आणि अजिंक्य कुलकर्णी यांनी.

याची सिनेमॅटोग्राफी चैतन्य वाघ यांनी केली आहे तर संकलन शुभम पगारे यांचे आहे. हे सुमधूर गीत आपल्या भेटीला झी म्युझिक या कंपनीने आणले आहे. सध्याच्या या कोविडच्या वातावरणात हे गीत खूपच आल्हाददायक आहे. याचा आस्वाद एकदा तरी घ्यायलाच हवा…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.