Ramayan TV Serial in Marathi: आता स्टार प्रवाहवर दर्शक पाहू शकणार मराठी ‘रामायण’

New Marathi TV Serial: Now viewers can watch Marathi 'Ramayana' on Star Pravah

एमपीसी न्यूज- एकेकाळी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या मालिकांचे करोनाच्या काळातील लॉकडाउनमुळे दूरदर्शवर पुनर्प्रसारण सुरु झाले. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘श्रीकृष्ण’ यासारख्या मालिका दाखवण्यात आल्या. आता ‘रामायण’ ही मराठीत डब केलेली मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर एक जूनपासून रात्री नऊ वाजता मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतकी महान कथा, संस्कार शिकवणारी, आयुष्य घडवणारी मालिका पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर येतेय याचा आनंद आणि अभिमान आहे. आपल्या भाषेतले प्रभू राम , सीतामाता, लक्ष्मण, हनुमान कसे दिसतील? आणि कसे वाटतील? हे पाहायला नक्की आवडेल. माझी खात्री आहे मायबोली मराठीमध्येही ही मालिका तितकीच प्रभावी ठरेल.’

या मालिकेत अभिनेता स्वप्निल जोशीनेही महत्त्वाची भूमिका साकारली होती. मराठीतून सुरु होणाऱ्या रामायणाबद्दल सांगताना स्वप्निल म्हणाला, ‘साधारण 30 वर्षांपूर्वी रामायण पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं. तेव्हापासून ते जितके वेळा ज्या ज्या चॅनेलवर दाखवलं गेलं तेव्हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना या मालिकेने भुरळ घातली. त्यामुळे स्टार प्रवाहचं खूप खूप अभिनंदन की, रामायण आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मला खूप आनंद आणि अभिमान आहे की मी या मालिकेचा एक भाग होतो. मी कुश ही भूमिका साकारली होती. आता हे सगळं आपल्या मातृभाषेत अनुभवायला मिळणार याचा आनंद वेगळाच आहे. प्रभू रामचंद्रांची कृपा आपल्या सर्वांवर राहो हीच प्रार्थना.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.