Pune : अखेर राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यात मिळाली जागा

सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानावर बुधवारी होणार जाहीर सभा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पुण्यात जागा मिळाली. शुक्रवार पेठेतील सरस्वती मंदिर संस्थेचा मैदानावर बुधवारी (दि.9) सायंकाळी सहा वाजता राज यांनी तोफ धडाडणार आहे.

मनसेच्या प्रचाराचा नारळ यावेळी फुटणार आहे. ईडी चौकशी नंतर राज शांत होते. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल करणार आहेत. या सभेला मनसे सैनिक, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे सचिव सचिन मोरे यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like