Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्‌स सिटीच्या दिशेने – विलास मडिगेरी

एमपीसी न्यूज – उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडची स्पोर्ट्‌स सिटी अशी ओळख निर्माण व्हावी यासाठी आमदार महेश लांडगे यांनी चालविलेले प्रयत्न स्तूत्य असून त्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असा विश्वास महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी व्यक्त केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ इंद्रायणीनगर भोसरी येथे आयोजित बैठकीत मडिगेरी बोलत होते. यानंतर मोशी, भोसरी प्राधिकरण परिसरात आमदार लांडगे यांचे प्रचारपत्रक वाटून प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, शिवसेनेचे भोसरी व खेड सहसंपर्कप्रमुख व कामगार नेते इरफान सय्यद, भोसरी शिवसेना प्रमुख धनंजय आल्हाट, नगरसेविका नम्रता लोंढे, माजी नगरसेविका वर्षा मडिगेरी, कामगार नेते हनुमंत लांडगे, युवा नेते योगेश लोंढे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

मडिगेरी, पिंपरी-चिंचवडची उद्योगनगरी, सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख आहेच. त्याबरोबरच शहराची स्पोर्ट्‌स सिटी म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. भोसरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल साकारात आहे. भोसरीतच बंदिस्त गॅलरी असलेले स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. इंद्रायणीनगरला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटींग ग्राऊंडचे लोकार्पणही करण्यात आले आहे. जाधववाडी चिखली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीपर्पज स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. च-होली येथे जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले आहे. आण्णासाहेब मगर स्टेडीयमला गतवैभव प्राप्त करून देऊन पिंपरी-चिंचवडचा नावलौकिक स्पोर्ट्‌स सिटी, असा व्हावा यासाठी आमदार लांडगे प्रयत्नशील आहेत.

आमदार लांडगे यांच्या प्रयत्नातून परिसरनिहाय क्रीडासंकुले निर्माण करण्यात आली आहेत, असे सांगून इंद्रायणीनगरचे स्केटिंग ग्राऊंड, गवळीनगर हनुमान कॉलनी येथील बॅडमिंटन कोर्ट, गावजत्रा मैदान भोसरी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती केंद्र तसेच भोसरी मल्टीपर्पज स्पोर्ट्‌स गॅलरी, जाधववाडी रिव्हर रेसिडेन्सीजवळील चिखली मल्टीपर्पज स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, से. नं. 9 मोशी प्राधिकरण येथील बास्केटबॉल मैदान, से. नं. 4 येथील टेनिस कोर्ट आणि हॉलीबॉल, च-होली येथील जलतरण तलाव, से. नं. 10 भोसरी एमआयडीसी येथील तसेच से. नं. 19 शरदनगर चिखली येथील प्ले ग्राऊंड याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

आण्णासाहेब मगर स्टेडियमची 35 वर्षापूर्वी निर्मिती करण्यात आली. राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्या पुढाकाराने हे स्टेडियम तयार करण्यात आले. मात्र, त्यानंतर या मैदानाच्या विकासाच्या दृष्टीने विचार केला गेला नाही. या मैदानावर शहरातील अनेक खेळाडू घडले. वाढत्या शहरीकरणाबरोबर क्रीडाविकासाची गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी सर्व प्रकारचे खेळ शिकविले जावेत यासाठी त्या मैदानावर स्पोर्ट्‌स युनिव्हर्सिटी करण्यात यावी, असा आमदार महेश लांडगे यांचा संकल्प असून तो ते धडाडीने पूर्णत्वास नेतील असा विश्वास विलास मडिगेरी यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.