BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अनैतिक संबंधातून एकाची डोक्यात रॉड घालून हत्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील दत्तवाडी परिसरात अनैतिक संबंधातून एकाची डोक्यात रॉड घालून हत्या करण्यात आली. ही घटना आज रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

नागेश कदम (वय 37), असे मयताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती व आरोपी गणपत झगडे यांचे घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून दोघात वाद झाला. वादात आरोपी गणपत झगडे याने नागेश कदम याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.