_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

New music album: श्रावणाची जादू पसरणारे ‘श्रावणमासी’ रसिकांच्या भेटीला

स्वप्निल बांदोडकरचा ‘ती’ हा नवा अल्बम प्रदर्शित झाला आहे.

एमपीसी न्यूज – आपल्याला लहानपणापासूनच श्रावण महिना आला की अनाहूतपणे आठवते ती बालकवींची ‘श्रावणमासी’ ही नितांतसुंदर कविता. शालेय जीवनात पाठ केलेली ही निसर्ग कविता आजही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, टप्प्यावर सहजपणे नेहमी भेटते. तिच्यात वर्णन केलेले ते श्रावणाचे, निसर्गाचे लोभस, देखणे रुप मनाच्या कुपीत दडवून ठेवलेल्या अत्तरासारखे आजदेखील सुगंधी आहे.

त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी यांची ‘श्रावणमासी हर्षमानसी’ ही निसर्ग कविता आता श्रावण महिना सुरु झाल्याच्या निमित्ताने सागरिका म्युझिकने ही कविता नव्या रुपात, नव्या चालीत सादर केली आहे. गायक स्वप्निल बांदोडकरने नव्या रुपातलं ‘श्रावणमासी हर्षमानसी’ हे गाणे गायलं आहे. नुकताच या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

स्वप्निल बांदोडकरचा ‘ती’ हा नवा अल्बम प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या अल्बममधील ‘कसा चंद्र’ आणि ‘सौरी’ ही गाणी लोकप्रिय ठरत आहेत. त्यातच आता बालकवींची श्रावणमासी ही कविता स्वप्निलने नव्या अंदाजात सादर केली असून त्यालादेखील प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. या गाण्याला संगीतकार नीलेश मोहरीर याने संगीत दिले असून कलांगणच्या बालकलाकारांनी कोरस दिला आहे.

‘ती’ हा स्वप्निल बांदोडकरचा सागरिका म्युझिकसोबत हा पाचवा अल्बम आहे. यापूर्वी त्याने ‘बेधुंद’, ‘तू माझा किनारा’, ‘तुला पाहिले’ हे हिट अल्बम दिले आहेत. त्यातील ‘राधा ही बावरी’, ‘गालावर खळी’, ‘राधा राधा’, ‘मंद मंद अशी’ गाणी सुपरहिट झाली आहेत. त्याचप्रमाणे ‘श्रावणमासी हर्षमानसी’ हे गाणंही श्रोत्यांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.