Landewadi : माझी स्पर्धा दिलीप वळसे पाटील यांच्याशी; अमोल कोल्हे यांचे राजकीय गणित काय – आढळराव  पाटील

(लीना माने)

एमपीसी  न्यूज – शिरुर लोकसभा मतदार संघात माझी स्पर्धा  डॉ. अमोल कोल्हें यांच्याबरोबर नाही. राष्ट्रवादी व दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबर स्पर्धा आहे. माझ्यासमोरचा उमेदवार हा उमेदवार नसून  त्यांच्यादृष्टीने हा दोन महिन्याचा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा त्यांना अॅक्टिंगसाठी मुंबईत जावे लागणार, अशी टीका शिरुर मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांनी केली.  माझ्या दृष्टीने मला लढायच मला जिंकायचय. शिवसेना भाजपचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहे. सणसणीत व खणखणीत चौकार मारेल याची मला पूर्ण खात्री आहे. एमपीसी  न्यूजच्या प्रतिनिधीने एक दिवस उमेदवारांसोबत प्रवास केला. त्यांच्या रोजच्या प्रचाराची माहिती घेतली. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांची घेतलेली मुलाखत –

शिरुर मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात कोणती विकासकामे केली व इथून पुढील पाच वर्षात कोणती कामे करणार?

गेल्या पंधरा वर्षामध्ये काय केले हे पाहण्यापेक्षा पाच वर्षात काय केले हे महत्वाचे. सुरुवातीचे दहा वर्षे  काँग्रेसची युपीए 1  युपीए2 मला काम करण्याची संधी मिळाली नाही.  या वर्षात मतदार संघाकडे न्याय देण्याचे काम केले नाही. महत्वाचते प्रश्न मार्गी लागले नाहीत. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. केंद्राच्या अनेक योजनांचे काम या मतदारसंघात केले. शिरुर मतदारसंघाचा प्रकल्प पुणे नाशिक  रेल्वे, हायवे प्रकल्प या सरकारच्या काळात मंजूर केली. सत्तेतील खासदार आहे. पाच वर्षात साडे चौदा हजार कोटीची कामे केली. ही मोठी संधी होती. व त्याची किंमत रेल्वेची कामे चेहरा मोहरा या मतदारसंघात बदलण्याचा प्रयत्न मी केला. एकाच विचाराचे सरकार व खासदार असतील मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी मोठी मदत होते.

आपण विमानतळ घालवले, असा आरोपही आपल्यावर होत आहे यात किती तथ्य आहे?

हा भ्रम राष्ट्रवादीने नागरिकांच्या मनात निर्माण करून दिला आहे. 2005 ते 13 या कारकिर्दीत केंद्र सरकारची एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया एजन्सीने सहा वेळा सहा जागी विमानतळाच्या बाबतीत सर्व्हे केला. मात्र सर्वे करत असताना कोणालाही विश्वासात घेतले नाही. माझ्याशी चर्चा केली नाही. शेतक-यांशी चर्चा केली नाही. मोजणी होत असताना शेतक-यांचा विरोध होता म्हणून मी शेतक-यांच्या बाजूने उभा राहिलो. म्हणून मला त्याचा अभिमान आहे. शेतकरी हवालदिल झाला होता. त्यांना कोणीही विश्वासात घेत नव्हते. विमानतळाला माझा विरोध नाही पण शेतक-याला विश्वासात न घेता विमानतळ करत असाल तर त्याला माझा सक्त विरोध आहे. दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करत होते. एकट्या खासदाराला घाबरुन विमानतळ दुसरीकडे नेले, असे होऊच शकत नाही. एवढा मोठा प्रकल्प एकट्या खासदाराच्या ताकदीने असेल कर सरकारने बांगड्या घातल्या आहेत.

निष्क्रीय खासदार आहात, असा आरोप विरोधक करीत आहेत याबाबतीत काय तथ्य आहे ?

राष्ट्रवादी काँग्रेसने असे बोलणे की शिवाजीराव आढळराव निष्क्रीय खासदार आहे. हा राजकारणातला सगळयात मोठा विनोद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला माहिती आहे की सर्वात जास्त कार्यकुशल, कार्यक्षम, संपर्क असणारा, सर्वात जास्त विकासकामे करणारा महाराष्ट्रातला मी एकमेव खासदार आहे. शरद पवारांचे चार खासदार लोकसभेत होते. त्यांच्या विकासकामांची टोटल करा व माझ्या विकासकामांची टोटल करा मी भारी पडेल. शिरुर मतदारसंघात यापूर्वी कोण खासदार होते तर शरद पवार. त्यांनी शिरुर, हवेलीसाठी काय केले. काहीही नाही. कारकीर्द प्रत्येक गावात  मी खासदार निधीच्या माध्यमांतून पोहोचलोय. लोकांना पूर्वी खासदार दिसत नव्हता, खासदार काय असतो हे माहित नव्हते. हे मी वाड्या वस्त्यावर जाऊन आलो विकासकामांच्या बाबतीत मी सांगेन समोरासमोर बसायची माझी तयारी आहे. फक्त राष्ट्रवादीने निष्कीय म्हटले तर होत नाही. लोकांच्या मनांत माझी प्रतिमा चांगली आहे ती तशीच राहणार. विकासकामे करणारा विकास पुरुष आहे. राष्ट्रवादी काय म्हणतेय याकडे लक्ष द्यायचे कारण नाही.

तुमच्या समोर अमोल कोल्हे हे प्रतिस्पर्धा आहेत स्पर्धा तीव्र त्याबाबतीत काय सांगाल ? –

अमोल कोल्हेंना वाटत आहे ती तीव्र स्पर्धा. अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप करणे. लोकांमध्ये पसरुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या दृष्टीने माझे प्रतिस्पर्धी प्रत्येक वेळेला तुल्यबळच राहिले आहे. मग ते देवदत्त निकम असतील विलास लांडे असतील. कधीही कोणाला कमी लेखले नाही. अमोल कोल्हे राजकीय योगदान काय, विलास लांडे तरी दहा वर्षे आमदार होते. देवदत्त निकम यांना ग्रामीण भागातील राजकारण माहिती आहे. अशोक मोहोळ यांची हयात राजकारणात गेली होती. या उमेदवाराचे काय. मतदार संघ व राजकारणासाठी मतदार संघ त्यांना कळला नाही. मतदार संघातले प्रश्न माहिती नाहीत. जे काही राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार व दिलीप वळसे पाटील लिहून देतील त्या स्क्रीप्टप्रमाणे डायलॉगबाजी मारायचे एवढेच त्यांना माहिती आहे. कोणत्याही प्रश्नांची जाण नसलेला हा उमेदवार आहे. लोकांना नेता व अभिनेता यामधला फरक कळतोय त्यांचे आव्हान माझ्यादृष्टीने अजिबात नाही.

मतांचे ध्रूवीकरण होत आहे असे वाटते का ?

मतांचे ध्रूवीकरणाचा संबंध नाही. मी एकदम कमफर्टेबल आहे. पूर्वी तिन्ही उमेदवारांपेक्षा मला जास्त कम्फर्टेबल वाटते. कारण माझ्यासमोर असलेला उमेदवार हा राजकारणासाठी नाही. त्यांच्या दृष्टीने हा दोन महिन्याचा कार्यक्रम आहे. खासदारकीची अॅक्टिंग आहे आणि अॅक्टिंग झाल्यानंतर त्यांना पुन्हा सिरियलच्या क्षेत्रात जावे लागणार आहे. हे जनतेने ठरवलेले आहे. शिरुर मतदारसंघातील लोकांना माहिती आहे काम करणारा माझा फक्त दादा आहे, माझ्या कुटुंबातील माणूस आहे. आज मालिकेत काम करणारा माणूस याचा फरक समजण्याइतपत जनता सूज्ञ आहे. आव्हान वगैरे माझ्यादृष्टीने काहीही नाही.

चौकार मारणार का ?

चौकार शंभर टक्के मारणार. समोर मैदान उभे आहे. वातावरण चांगले आहे. सगळ्या बाजूने लोकांनी कौल दिलेला आहे. दोन ते तीन महिन्यापासून प्रचारानिमित्त लोकांच्या वाड्या वस्त्यावर चेह-यावर आनंद, इच्छा माझे व आमचे दादा पुन्हा एकदा खासदार व्हावेत व लोकसभेत जावेत. केंद्रामध्ये चांगली कामगिरी करावी, अशी इच्छा आहे.

तुम्ही प्रतिस्पर्धी कोणाला मानता, कोल्हे का राष्ट्रवादी ?

माझ्या दृष्टीने अमोल कोल्हे हा माझा प्रतिस्पर्धी नाही. माझ्या दृष्टीने दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच माझे प्रतिस्पर्धी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकवेळा ताकदीने उभी राहत असते. माझ्या दृष्टीने मला लढायचे आहे. मला जिंकायचे. शिवसेना भाजपचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहे. सणसणीत व खणखणीत चौकार मारेल याची मला पूर्ण खात्री आहे.

संभाजी महाराज मालिका सुरु आहे याचा अमोल कोल्हेंना कितपत फायदा होऊ शकेल ?

मला त्यातील काही फारसे माहित नाही. मी ती मालिका कधी बघितली नाही. मालिका पाहणे व मतदान करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. मालिका पाहून जर मतदान करायचे असते तर देशाचे पंतप्रधान अमिताभ बच्चन केव्हाच झाले असते. लोकांना माहित आहे. सिरियलमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा माणूस तिथेच बरा दिसतो आणि मतदार संघात धावणारा खासदार हा लोकांना तिथेच आवडत असतो. सगळे मंत्रिमंडळच फिल्म इंडस्ट्रीजने व्यापले असते.

अमोल कोल्हे हे प्रतिस्पर्धी आहेत म्हणून आढळरावांना घाम फुटला आहे का ?

हे चित्र निर्माण करण्यात राष्ट्रवादी पटाईत आहे. घाम फुटला हे चुकीचे आहे. त्यांची चिडचिड झाली आहे. मी गेल्या दोन महिन्यांपासून वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करत नाही. जातीपातीचे राजकारण, मी त्यांची जात काढलीच नाही. त्यांना प्रचाराला मुद्देच नाहीत माझ्यावर काहीतरी  टीका करायची. मी त्यांचे नाव उल्लेख कोठेही करत नाही. जाणीवपूर्वक व खोटेनाटे बोलणे, सोशल मीडियावर खोटा प्रचार करणे ही राष्ट्रवादीची संस्कृती आहे. त्याप्रमाणे ते वागत आहे. पूर्वीच्या तिन्ही निवडणुकांपेक्षा वातावरण चांगले आहे. विकासकामे केलेली आहे. लोकांचा संपर्क चांगला. खासदार व सरकार निवडायचा देशाचे नेतृत्व निवडायचे. हे सगळ्यांनी मतदानाचे हक्क, कर्तव्य बजावावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.