Pune : महापालिकेसमोर वाहने पार्किंग करणे पडले महागात; पोलिसांनी लावले जॅमर

एमपीसी न्यूज – उठसूठ कोणीही यावे आणि पुणे महापालिकेसमोर पार्किंग करावे, गुरुवारी भलतेच महागात पडले. पोलिसांनी चारचाकी, दुचाकी वाहनांना जॅमर लावून धडाकेबाज कारवाई केली.

कारमध्ये बसलेल्या चालकांना ओ साहेब…. ओ साहेब! करण्याची वेळ आली. पण, पोलिसांनी काही दाद दिली नाही. दंड वसूल करीतच जॅमर काढण्यात आले. अनधिकृत पार्किंग करताना आता 10 वेळा विचार करावा लागणार आहे. महापालिकेत कोणत्याही छोट्यामोठ्या कामानिमित्त चारचाकी वाहने आणणे आता एक प्रकारची क्रेझच झाली आहे.

महापालिकेत पार्किंगला जागा मिळत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्यांची संख्या असते. त्यामुळे वाहनधारकही महापालिका परिसरातील गल्लीबोळात वाहने पार्किंग करून रस्ता अडवतात. वाहतूक पोलिसांनीही आगामी काळात ही धडाकेबाज कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.