BNR-HDR-TOP-Mobile

Pune : भाजपच्या बैठकीला जाण्याचा मोह आवरला नाही – मंत्री सुभाष देशमुख

एमपीसी न्यूज – सांगलीला जात असताना भाजपची पुण्यात बैठक सुरू असल्याचे मला कळले. या बैठकीला जाण्याचा मोह मला आवरला नाही. या बैठकीत सांगली, कोल्हापूरातील पूरबाधितांसाठी मदत उपलब्ध होऊ शकते, या विचाराने मी या बैठकीला गेलो. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या बैठकीला उपस्थित राहिलो, असे मदत व पुनर्वसन मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

सांगली जिल्ह्यामध्ये पुराणे थैमान घातले असून, आजही 30 ते 35 हजार नागरिक पुरात अडकले आहेत, असे असताना सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख हे गुरुवारी पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, त्यावर स्पष्टीकरण देताना देशमुख बोलत होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3