New Normal Webinar: ‘रंग बदलत्या नॉर्मलचे’ दिग्गजांच्या तोंडून ऐका कोरोनानंतरचे बदलते जग

या वेबिनारचे आयोजन सायंकाळी 7 ते 8 या वेळेत करण्यात आले आहे. झूम मिटिंग या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व सिंबायोसिस कौशल्य विकास आणि व्यवसाय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ऑनलाइन गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘रंग बदलत्या नॉर्मलचे’ या विषयावर तीन दिवसीय चर्चा सत्राचे वेबिनारद्वारे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात संबंधित क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपले विचार मांडत आहेत.

‘रंग बदलत्या नॉर्मल’चे या फेस्टिवलची सुरुवात 29 ऑगस्ट रोजी झाली. पहिल्या दिवशी ‘कोविडनंतरचे शिक्षण आणि विज्ञान’ या विषयावर सिंबायोसिस कौशल्य विकास आणि व्यवसाय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार, पुणे आयसरचे अध्यक्ष अरविंद नातू व नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेनेद यांनी आपले विचार मांडले. पहिल्या दिवशीच्या चर्चा सत्राला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

अशाच प्रकारच्या चर्चासत्राचे आयोजन आज (दि. 30) आणि उद्या (दि.31) करण्यात आले असून या कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे आहे.

रविवारी (दि. 30 ऑगस्ट)

विषय- कोविडनंतर प्रसिद्धी माध्यमांची भुमिका
सहभाग – प्रसन्न जोशी ( न्यूज अँकर, एबीपी माझा ), डॉ. समीरण वाळवेकर (प्रसार माध्यम तज्ञ), आर.जे. बंड्या (रेडिओ जॉकी, 95 बीग एफएम )

या वेबिनारचे आयोजन सायंकाळी 7 ते 8 या वेळेत करण्यात आले आहे. झूम मिटिंग या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी खालील दुवा वापरता येईल.

https://us02web.zoom.us/j/82381233632

Meeting ID: 823 8123 3632

यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या कार्यक्रमाशी नागरिकांना जुळता येणार आहे. त्यासाठी यूट्यूबच्या थेट प्रक्षेपणाची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सोमवार (दि. 31)

विषय – कोविड कालावधीनंतर फिल्म आणि थिएटर
सहभाग – प्रशांत दामले (प्रसिद्ध अभिनेते), राहुल सोलापूरकर (प्रसिद्ध अभिनेते), अभिराम भडकमकर ( प्रसिद्ध लेखक)

या वेबिनारचे आयोजन सायंकाळी 7 ते 8 या वेळेत करण्यात आले आहे.

या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी झूम मीटिंगसाठी खालील दुवा वापरा.

https://us02web.zoom.us/j/87812637305
Meeting ID: 878 1263 7305

कार्यक्रमाच्या युट्युबवरील थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होण्यासाठी खालील दुवा वापरता येईल.

कार्यक्रमाच्या सर्व चर्चासत्रासाठी सिंबायोसिस कौशल्य विकास आणि व्यवसाय विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मिडिया मॅनेजमेंटचे विभाग प्रमूख डॉ. गिरीश रांगणेकर हे करणार आहेत.

कार्यक्रम संपल्यानंतर 8 ते 9.30 या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सादर केली जाणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे शास्त्रीय गायन, वादन, सुगम संगीत, नृत्याविष्कार नागरिकांना पाहता येणार आहेत.

‘रंग बदलत्या नॉर्मल’चे या फेस्टिव्हलचे संयोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कचे अध्यक्ष श्रावण हर्डीकर तसेच सायन्स पार्कचे संचालक व अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी सिंबायोसिस कौशल्य विकास आणि व्यवसाय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार व कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी यांचे सहकार्य लाभले. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन चर्चासत्राचा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व सिंबायोसिस कौशल्य विकास आणि व्यवसाय विद्यापीठ, किवळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.