Pimpri : राष्ट्रवादीच्या नगरसेविकांकडून पूरग्रस्तांसाठी पावणेसहा लाखांची मदत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शरद पवार यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागातील नागरिकांना आर्थिक मदत म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ३६ तसेच दोन स्वीकृत, असे एकूण ३८ नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन ५ लाख ७० हजार रुपये राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टला चेकव्दारे देण्यात आले.

सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागातील पूरग्रस्तांना शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी धनादेश जमा करण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, प्रशांत शितोळे, फजल शेख, राजू मिसळ, मोरेश्वर भोंडवे, रोहित काटे, जावेद शेख, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ, प्रसाद शेट्टी, आनंदा यादव,  वर्षा जगताप, सुनील गव्हाणे, गंगा धेंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.