New Parliament Building News : नव्या संसद भवन इमारतीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसीन्यूज : नव्या संसद भवनाच्या इमारतीचे (New Parliament Building) भूमिपूजन आज, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन संसद भवनात अनेक नवीन कामं केली जात आहेत ज्यामुळे खासदारांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

इंडिया गेटजवळ ‘सेंट्रल विस्टा’ कार्यक्रमांतर्गत तयार होणाऱ्या या नव्या संसद भवनाच्या भूमीपूजन कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. परंतु, संसद भवनाची निर्मिती मात्र आत्ताच सुरू होऊ शकणार नाही कारण या संबंधातील एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

मोदी म्हणाले, आपल्या देशाचे आणि संविधानाचे निर्माण या संसद भवनात झाले आहे. या संसद भवनाने देशाचे अनेक चढ-उतार, आशा-आकांक्षा पहिल्या आहेत. संसदेच्या सामर्थ्यवान इतिहासाबरोबरच वास्तवही स्वीकारने आवश्यक आहे. हे संसद भवन आता विश्रांती मागत आहे.

नव्या निर्माणाच्या माध्यामातून संसद भवन अपग्रेड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नवी ध्वनी, आयटी सुरक्षा व्यवस्था वापरण्यात येणार असल्याचेही तटांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, जेव्हा विविध नागरिक खासदारांना भेटायला येतात तेव्हा त्यांना सध्याच्या संसद भवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. संसद भवनात जागेचा अभाव आहे. परंतु, भविष्यात प्रत्येक खासदारासाठी आपल्या मतदार संघातील लोकांना भेटू शकतील, अशी व्यवस्था नव्या संसद भवनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.