New Parliment : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य दिव्य संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन; ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’चीही स्थापना

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (New Parliment) हस्ते भव्य दिव्य अशा संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या सोबतच लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’चीही स्थापना करण्यात आली. यावेळी पूजा व बहुधार्मिक प्रार्थनेच्या उच्चारणात संसदेच्या इमारतीचे उद्घाटन झाले.

नवीन इमारतीच्या स्मरणार्थ फलकाचे अनावरणही मोदी यांनी  केले. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि अधेनाम द्रष्टे उपस्थित होते. द्रष्टे यांनी  ‘सेंगोल’ प्रतीक पंतप्रधान मोदींना सुपूर्द केले.

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हंटले, की  नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 142 कोटी भारतीय जनतेच्या इच्छा पूर्ण केल्या. हा एक ऐतिहासिक दिवस आहे.

एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले, “आज देशवासियांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, या दिवशी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवन देशवासियांना समर्पित करणार आहेत. त्याबद्दल पंतप्रधान अभिनंदन आणि आभाराचे पात्र आहेत. त्यांनी उचललेले ऐतिहासिक पाऊलाबद्दल मी पंतप्रधानांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो कारण त्यांनी 142 कोटी भारतीय जनतेच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत.”

Pune : राजीव गांधी स्मारक समितीतर्फे केंद्र सरकारच्या निषेधार्थ पुण्यात स्वाक्षरी मोहीम

सात दशकांपासून ऐतिहासिक ‘सेंगोल’चे घर असलेल्या अलाहाबाद (New Parliment) संग्रहालयातील अधिका-यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीतील नवीन संसद भवनात त्यांचा अनमोल ठेवा हा त्यांच्यासाठी तसेच प्रयागराजच्या रहिवाशांसाठी अभिमानाचा विषय आहे. ‘सेंगोल’, सोन्याचा कोट असलेले चांदीचे बनवलेले चोल-युगीन राजदंड 1947 मध्ये ब्रिटिशांकडून झालेल्या सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे. आज ते लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ स्थापित केल्याने त्याची किंमत कैक पटीने वाढली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.