Pune : आंबील ओढ्याप्रमाणेच शहरातील इतर नाल्यांकडेही लक्ष द्या – नवनिर्वाचित आमदार, चेतन तुपे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतर्फे आंबील ओढ्याच्या विकासासाठी 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याप्रमाणेच पुणे शहरातील इतर नाल्यांकडेही लक्ष द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार चेतन तुपे यांनी आज केली.

अतिरीक्त आयुक्त रुबेल अग्रवाल यांची तुपे यांनी भेट घेतली. नगरसेविका नंदा लोणकर यावेळी उपस्थित होत्या. आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयात तुपे यांचा महापालिका कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. महापालिका शाळांच्या भिंती आरसीसीमध्ये करण्यात याव्यात, कोंढवा गावठाणात भराव खचून गेला आहे. त्या ठिकाणी महापालिकेने सीमाभिंत बांधून द्यावी, भीमनगर परिसरात लोखंडी पूल खिळखिळा झाला आहे. त्याचे काम करण्यात यावे, असेही तुपे म्हणाले.

हडपसर भागात स्ट्राँग वॉटर लाईन टाकण्यात याव्यात, प्रायव्हेट सोसायट्यामध्ये भराव निघून गेला आहे. त्यामुळे सीमाभिंत कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लेफ्टटाऊन पर्वतीमध्ये अनेक सीमाभिंत कमी उंचीच्या आहेत. त्या वाढविण्यात याव्या. दरम्यान, राष्ट्रवादीतर्फे एचसीएमटीआर संदर्भात कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तर, कात्रज – कोंढवा रस्त्याची निविदा निवडणुकीसाठी घाईघाईने काढण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.