BNR-HDR-TOP-Mobile

Pune : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्याहून दिल्लीकडे प्रयाण

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रविवारी लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.

यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री छगन भुजबळ, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयसवाल, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, एअर कमोडोर राहूल भसीन, लेफ्टनंट जनरल सतींदर कुमार सैनी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच जयंत येरवडेकर, धीरज घाटे, राजेश पांडे, हेमंत रासने, दीपक मिसाळ उपस्थित होते.

देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवस पुण्यात होते. दरम्यान, दिल्लीला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी रुबी हॉल क्लिनिक येथे जाऊन माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ पत्रकार अरूण शौरी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

 

Advertisement

HB_POST_END_FTR-A3