Pimpri : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सीमा सुकाळे

पदाधिका-यांची आज निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या पदाधिका-यांची निवड आज करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी सीमा सुकाळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय ढगे, सचिवपदी मुकुंद वाखारे, खजिनदारपदी महादेव बोत्रे यांची निवड करण्यात आली.

यावेळी सहकारी अधिकारी श्रेणी 1 अधिन उपनिबंधक सचिन सरसमकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक शशिकांत  झिंजुर्डे, माजी अध्यक्ष आबा गोरे, संचालक महाद्रंग वाघेरे, संजय कुटे, मनोज माछरे, चारुशिला जोशी, दिलीप गुंजाळ, सतीश गव्हाणे, राजाराम चिंचवडे, रमेश चोरघे, भगवान मोरे, नथा मातेरे, यशवंत देसाई, अंबर चिंचवडे आदी संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी महासंघाचे मार्गदर्शक शशिकांत झिंजुर्डे म्हणाले, सर्व संचालकांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करुन संस्थेने नुकतेच 150 कोटी करुपये उलाढालीचे उद्दीष्टे पूर्ण केल्याबद्दल संचालकांचे अभिनंदन केले. भविष्यात सभासदांना मुदत कर्ज 10 लाखांएवजी 15 लाख व अल्प मुदत कर्ज 20 हजार एवजी 50 हजार करण्याचे संचालक  मंडळ विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सभासदांची मोठ्या प्रमाणात आर्थिक गरज पूर्ण होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.