Bhosari : मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-या दोन अल्पवयीन चोरट्यांकडून पावणेदोन लाखांच्या दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणा-या दोन अल्पवयीन चोरट्यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 78 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई आशिष गोपी यांना माहिती मिळाली की, भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ मैदानात दोन चोरटे येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

_MPC_DIR_MPU_II

दोन्ही चोरट्यांना पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. तसेच पिंपरी-चिंचवड, पुणे आणि दौंड येथून एकूण पाच दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी 1 लाख 78 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील दोन आणि दौंड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, आशिष गोपी, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, सागर जाधव, संदीप जोशी, सागर भोसले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.