Chinchwad : पीडित महिलांसाठी भरोसा सेल सुरु करण्याचे पोलीस आयुक्तांचे वुमेन हेल्पलाईनला आश्वासन

एमपीसी न्यूज – पीडित महिलांसाठी भरोसा सेल सुरु करण्यात येईल, असे आश्वासन नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी वुमेन हेल्पलाईनच्या पदाधिका-यांना दिले. विमेन हेल्पलाईन, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी अध्यक्षा नीता परदेशी, अॅड सारिका परदेशी, अॅड सुभाष माचरे, अॅड. मोनिका पिसाळ, भारती सारडा, जयश्री पाटील, शोभा पगारे, सुनीता पाटील, निला राजगुरू, हेमा वाकळे, दीपाली येवले, सुनीता काणे, संगीता पुरी, सविता कर्पे, सुषमा वैद्य, संध्या महाजन, सोनाली घोडेकर, शैलजा गुरव, कीर्ती सावकार, प्राजक्ता रुद्रावर, रिटा मेहता, शारदा हत्तीकट्टी, नंदा करे आदी यावेळी उपस्थित होत्या.

वुमेन हेल्पलाईनच्या पदाधिका-यांनी नवनियुक्त आयुक्त संदीप बिष्णोई यांची चिंचवड येथील पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेतली. त्यांच्याशी शहरातील महिलांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. आयुक्तांना शुभेच्छा देत हेल्पलाईनच्या वतीने निवेदन देण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचार, विनयभंग, घरगुती अत्याचार वाढत आहेत. पुढील काळात बलात्कारमुक्त शहर होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात असलेल्या दक्षता समिती, शांतता समितीवर विमेन हेल्पलाईनच्या सदस्यांना घ्यावे. शासनाच्या नियमानुसार ज्या शासकीय, निमशासकीय विभागांमध्ये महिला काम करतात, तिथे विशाखा समिती स्थापन करावी. तक्रारदार महिलेला पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक मिळावी व महिलांना न्याय मिळावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावर बोलताना पीडित महिलांसाठी भरोसा सेल सुरू करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. दक्षता समिती, शांतता कमिटी स्थापन करू, तसेच वूमेन हेल्पलाईन संस्थेला वेळोवेळी सहकार्य करण्याचे देखील आश्वासन आयुक्तांनी दिले, अशी माहिती वुमेन हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.