Dehuroad : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाला फासला चिखल 

दोन अल्पवयीन मुले ताब्यात

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकावरील फोटोला चिखल फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 30) रोजी घडला. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

देहूरोड बाजारपेठेत भाजपचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला फलका लावण्यात आला आहे.  या फलकावरील मोदी यांच्या फोटोला चिखला फासण्यात आल्याचे समोर आले आहे.

याबाबत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक बारा आणि दुसरा तेरा वर्षाचा आहे. ही मुले खेळत असताना पायाला चिखल लागला. त्यानंतर चिखल काढत असताना बॅनरवरील फोटोस चिखल लागला गेला. यामागे कोणताही अनुचित प्रकार नसल्याचे मुले सांगत आहेत, असे देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.