Pune : नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात मोर्चा

एमपीसी न्यूज – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

‘एनआरसी, सीएए’ विरोधात देशातील विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. काही ठिकाणी प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद करून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तर, काही ठिकाणी ‘एनआरसी, सीएए’ समर्थनातही आंदोलन होत आहे. या मोर्चासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता बंद करण्यात आला होता.

कॅम्प परिसरातील बाबाजान दर्ग्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. कॅम्प परिसरातील आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. “हिंदुस्थान में हम किराएदार नहीं बराबर के हिस्सेदार हें ! सेव्ह कॉन्स्टिट्यूशन रिजेक्त कॅब”, असे लिहिलेले फलक आंदोलकांनी यावेळी हातात धरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या या मोर्चाचे नंतर सभेत रूपांतर झाले. मोर्चाच्या आयोजकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. भारताचा झेंडा देखील यावेळी मोर्चात आणण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.