BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पावसामुळे राज ठाकरे यांची सभा रद्द

0

एमपीसी न्यूज – पुण्यातील नातूबाग येथील सरस्वती मंदिराच्या मैदानावर आयोजित राज ठाकरे यांची सभा अखेर पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. राज ठाकरे हे उद्या कसबा गणपतीच्या दर्शनासाठी व आरतीसाठी सकाळी दहा वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांना सभेसाठी सरस्वती मंदिराच्या मैदानात जागा मिळाली होती. आज सायंकाळी सहा वाजता याठिकाणी राज यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, नेमका याचवेळी पाऊस सुरू झाल्याने राज यांची सभा होणार का नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तर सभेच्या ठिकाणी जमलेले कार्यकर्ते आणि नागरिक हे मैदानात खुर्च्या डोक्यावर घेऊन उभे होते. राज हे रात्री आठ वाजेपर्यंत सभास्थळी दाखल होणार होते. यापूर्वी झालेल्या पावसामुळे सभास्थळी झालेला चिखल अद्याप व्यवस्थितपणे दूर करता आलेला नाही. त्यात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. यामुळे राज यांच्या पाठीमागचे शुक्लकाष्ठ काही कमी होताना दिसत नाही. तसेच सभा होणार की नाही याची चर्चा सुरू होती.

मात्र, मुसळधार पावसामुळे ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3