Talegaon : भाजपच्या मावळ तालुका महिला अध्यक्षपदी सायली जितेंद्र बोत्रे

एमपीसी न्यूज – मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षपदी वेहेरगाव येथील सायली जितेंद्र बोत्रे यांची निवड करण्यात आली. पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते माऊली शिंदे, माजी सभापती राजाराम शिंदे, ज्येष्ठ नेते शंकरराव शिंदे,संघटनमंत्री किरण राक्षे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलींद बोत्रे,सरचिटणीस सुनील चव्हाण,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, तळेगाव भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे, प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, तालुका सरचिटणीस कृष्णा घिसरे, युवा मोर्चा कार्याध्यक्ष अर्जुन पाठारे, तालुका संघटक राजेंद्र सातकर, विद्यार्थी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, पुणे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार, कामशेतच्या सरपंच रूपाली शिंगारे, कामशेत शहर अध्यक्ष मोहन वाघमारे, कामशेतचे उपसरपंच संतोष कदम, माजी उपसरपंच गणपत शिंदे, माजी सरपंच सारिका शिंदे, सारिका घोलप, जनाबाई पवार, अरूण भानुसघरे आदी मान्यवर उपस्थितीत होते.

बोत्रे यांनी याआधी मावळ तालुका महिला आघाडीच्या उपाध्यक्षा म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचे संघटन कौशल्य उत्तम आहे. त्याचबरोबर मावळ तालुक्यातील राजमाता जिजाऊ महिला मंचच्या विद्यमान उपाध्यक्षा असून अनेक विविध सामाजिक संस्थांवर त्या काम करत आहेत.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सायली बोत्रे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन महिलांचे संघटन करून पक्ष संघटनेच्या वाढीसाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही बोत्रे यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.