Talegaon : सरस्वती विद्यामंदिरात संस्कृत दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिरमध्ये आषाढचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन संस्कृत दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, सरस्वती शिक्षण संस्थेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. ज्योती चोळकर, शिक्षण मंडळ सदस्य विश्वास देशपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी उपस्थित होते.

दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली ८ वी ते १० वी च्या काही मुलामुलींनी मनोरंजनाचा संपूर्ण कार्यक्रम संस्कृतमधून सादर केला. ८ वी च्या मुलामुलींनी संस्कृतमधून प्रदर्शन भरवले होते. प्रमुख पाहुण्यांनी संस्कृत भाषेबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका परदेशी यांनी संस्कृतमधून मनोगत व्यक्त केले.  संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी सर्वांना संस्कृत दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

१० वी मधील मीरा बेळगीकर व जान्हवी पाटील यांनी संस्कृत भाषेचे महत्व सांगितले. मनोरंजनाच्या कार्यक्रमात इयत्ता ८ वी च्या मुलांनी संस्कृत गीत गायले. गणेश वंदना भरतनाट्यम या नृत्य प्रकाराने झाली. संस्कृत सुभाषितांची अंताक्षरी इ. ९वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केली. या कार्यक्रमात वाद्य साथसंगत प्रवीण ढवळे यांनी केली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कार्यक्रम चांगला होण्यासाठी सहकार्य लाभले.

सूत्रसंचालन सुनीता कुलकर्णी यांनी संस्कृत मधून केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कार मुख्याध्यापिका परदेशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.