Pune : …सागर कारंडेच्या “इशारो इशारो में”चा पहिला प्रयोग शनिवारी  

एमपीसी न्यूज – कौटुंबिक संघर्षाची जिद्द तुम्हाला कोणत्या टोकाला घेऊन जाते आणि त्या निम्मिताने उलगडत जाणाऱ्या राग, द्वेष व  कौटुंबिक प्रेमाची कहाणी म्हणजे नव कोर मराठी नाटक इशारो इशारो में.

प्रसिद्ध विनोदसम्राट व वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर आलेला गुणी अभिनेता सागर कारंडे आणि अभिनेत्री संजना हिंदुपूर इशारो इशारो में या मराठी नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सरगम क्रिएशनचे अजय कासुर्डे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक जय कपाडिया यांच्या मूळ संकल्पनेतून उभे राहिलेले हे नाटक कौटुंबिक समस्या, प्रेम, राग, नाती आणि आपुलकीवर भाष्य करते. सहकलाकार अभिनेता उमेश जगताप आणि शशिकांत गंगावणे हे ही या नाटकात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.

नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग ८ फेब्रुवारीला यंशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे रात्री ९.३० ला पार पडणार आहे. नाटकाचे  संगीत राहुल रानडे यांनी दिले  आहे तर नेपथ्य अजय पुजारे यांनी केले आहे.नाटकाची सहनिर्मिती इशा कापडिया यांनी केली आहे तर स्वप्नील माने आणि मंदार काणे यांनीही नाटक उभं करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. आत्तापर्यंत वेगवेळ्या भूमिकेत दिसणारा सागर कारंडे या नाटकातून आपल्याला एका वेगळ्या रूपात बघायला मिळेल. तसेच नायक नायिका यांची कौटुंबिक संघर्षाची जिद्द त्यांना कोणत्या टोकाला यऊन जाते हे जाणून घेण्यासाठी  तुम्हाला नाट्यगृहात जाऊन इशारो इशारो में हे नाटक पाहावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.